जगदंबा विद्यालयाच्या शेतीत होणार कृषी तंत्रज्ञानाचा वापर
रयत शिक्षण संस्थेच्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या घोषवाक्याप्रमाणे संस्थेत आता शेतीविकास व प्रगत शेती तंत्रज्ञान या विषयावर भर देण्यात येत आहे. संस्थेतील ज्या शाळांना शेती उपलब्ध आहे. तेथे या दृष्टीने संस्थेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. नोकरीच्या अल्पसंधी व महाराष्ट्रात होणार्या शेतकरी आत्महत्या यावर उपाय म्हणून येथील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शेतीची आवड व आधुनिक शेती तंत्रज्ञान अवगत व्हावे म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
