Breaking News

सोनगाव ग्रा. पं. तर्फे स्व. ससाणे यांना श्रद्धांजली


सात्रळ प्रतिनिधी -राहुरी तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतच्यावतीने जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आ. स्व जयंत ससाणे यांना सोनगाव ग्रामपंचायतच्या मासिक सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सरपंच राजेंद्र अनाप अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसरपंच किरण अंत्रे, ग्रामसेवक व्ही. बी थोरात, संदीप अनाप, बाळासाहेब अंत्रे, चंदू अनाप, वर्षा अनाप, बेबी ब्राम्हणे, सुवर्णा अनाप, एजाज तांबोळी, साधना भोत आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.