Breaking News

खेडला दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व ग्रामविकास संघटनेचे बक्षीस वितरण

कुळधरण/प्रतिनिधी/- कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप तसेच कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपयांच्या रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखालीहा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत मोरे, पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव मोरे, उपाध्यक्ष गोरख मोरे, पुण्याच्या गांधी भवनचे इस्टेट मॅनेजर विठ्ठल सांबारे, १० वीचे वर्गशिक्षक मुगुटराव शेजाळ, तात्याराम गावडे, हसन सय्यद, चंद्रकांत चेडे आदी कर्मचारी, सुनील शेटे, कमलाकर शेटे, कुळधरण ग्रामविकास संघटनेचे मुख्य संघटक बंटीराजे जगताप, मधुकर सुपेकर, सुधीर जगताप, बंडु सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.किरण जगताप यांनी प्रास्ताविक केले. कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या स्पर्धेत 'लोकनायक'च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.प्राचार्य चंद्रकांत मोरे यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सत्काराचे आयोजन केले. डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले.