Breaking News

अग्रलेख - राज्यसभा निवडणूका आणि अन्वयार्थ


भारतीय लोकशाहीचे अविभाज्य अंग संसदीय परंपरा असलेले संसद. या संसदेत लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश होतो. अर्थात अनेकवेळेस लोकसभेत बहूमत असेल, तर राज्यसभेत सत्ताधार्‍यांचे बहूमत असेल असे नाही. तसेच राष्ट्रपती जर आपल्या पक्षांतील संख्याबळावर निवडून आलेला असेल, तर कायदे विनासायास पास होतांत असा आजवरचा आपल्या लोकशाहीचा अनुभव आहे. पुन्हा यावर चर्चा करण्याचे प्रयोजन म्हणजे राज्यसभेच्या 58 जागांसाठी मतदान होऊ घातले आहे. 58 हा मोठा आकडा असून, यामुळे सत्ताधारी भाजपचे अनेक आराखडे बहूमताअभावी धूळीस मिळाले आहेत. 2019 च्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूका आताच्या राज्यसभेच्या 58 जागा पुढील भविष्याची नांदी ठरवितांना दिसून येत आहे. 2014 मध्ये भाजपाने एकहाती लोकसभेत बहूमत मिळवित आपली वर्चस्व कायम ठेवले. मात्र भाजपला अनेकवेळेस राज्यसभेत बहूमताअभावी अनेक कायदे पास करतांना नाकीदम आले होते. देशभरातील 29 राज्यांपैकी 19 राज्यात भाजप सत्तेवर असल्यामुळे त्यांना साहजिकच राज्यसभेत जास्त खासदार पाठवणे सोपे ठरणार आहे. 58 पैकी 10 जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यामुळे भाजपला राज्यसभेतलं आपलं संख्याबळ वाढवण्याची संधी आहे. दरम्यान, या निवडणुक ांदरम्यान केरळमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 16 राज्यांमध्ये ही राज्यसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र- राज्यातील राज्यसभेचे सहा सदस्य एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. रिक्त जागेपैकी दोन भाजपला तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट ्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. सहाव्या जागेसाठी मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश- सध्याच्या विधानसभेच्या स्थितीनुसार या राज्यातील राज्यसभेच्या 9 पैकी 7 जागा भाजपला तर काँग्रेसला चार जागा मिळतील. तर सपाला दोन जागा मिळतील. मध्य प्रदेश- येथील राज्यसभेच्या पाच पैकी चार जागा भाजपला तर काँग्रेसला एक जागा मिळू शकते. आंध्र प्रदेश- तीन पैकी दोन जागा तेलगु देशम पक्षाला तर एक जागा अन्य पक्षाला मिळू शकते. कर्नाटक- येथील चार पैकी तीन जागा काँग्रेसला तर एक जागा भाजपला मिळू शकते. पश्‍चिम बंगाल- राज्यातील चार पैकी तीन जागा तृणमूल काँग्रेसला तर एक जागा माकपला मिळण्याची शक्यता आहे. गुजरात- राजसभेच्या चार पैकी दोन जागा भाजपला तर दोन काँग्रेसला मिळतील. बिहार- येथील पाच पैकी 3 जागा जदयू-भाजपला तर 2 जागा राजद-काँग्रेस यांना मिळू शकते. तेलंगणा- दोन पैकी एक टीआरएसला तर एक काँग्रेसला मिळू शकते. राजस्थान- येथील तिन्ही जागा भाजपलाच मिळतील. ओडिसा- 3 पैकी दोन जागा बिजू जनता दल आणि एक जागा अन्य पक्षाकडे जाऊ शकते. हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे. या सर्व भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निवडणूकीमुळे भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ वाढणार आहे. जरी हे संख्याबळ वाढणार असली, तरी पुढील काही महिन्यात, लोकसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या लोकसभेत जर भाजपांचे पुन्हा सत्तेत आली, तर राज्यसभेतील वाढते संख्याबळ भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते. थोडक्यात भाजपा सतराव्या लोकसभेत पुन्हा सत्तेत आली तर, क ायदे लोकसभा आणि राज्यसभेतील बहुमतामुळे संमत सहज शक्य होणार आहे. तसेच भाजपच्या साडेतीन वर्षांत जी अंदाधुंदी माजली आहे, ती येणार्‍या काळात पुन्हा अनुभवास मिळू शकते.