Breaking News

मालवण ’रॉक गार्डन’ येथे बोटींग सुविधा


सिंधुदुर्गनगरी, दि. 24, फेब्रुवारी - मालवणच्या ’रॉक गार्डन’ मध्ये आता बच्चे मंडळींसाठी छोट्या हँडल बोटींची सफर अनुभवयास मिळणार आहे. रॉक गार्डनमध्ये छोट्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. बच्चे कंपनीला या तलावात रंगीबेरंगी माशांच्या सहवासात बोटींगचा आनंद घेता येणार आहे. लवकरच या तलावाचा लोकार्पण सोहळा क रण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी दिली आहे. 
मालवणच्या रॉक गार्डनमध्ये बच्चे मंडळीना सुद्धा आनंद लुटता यावा यासाठी नगरपालिका आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांच्या संकल्पनेतून येथील छोट्या तलावात बोटींगची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. यासाठी मागच्या काही काळापासून रॉक गार्डनापराविना असलेल्या छोट्या तलावात काही बदल करून त्याची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. तलावासभोवती आकर्षक एलईडी लाईट बसविण्यात आल्या आहेत. या तलावात लहान मुलांना बोटींगसाठी सहा पॅडल बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे छोट्यांना तलावात बोटीमधून सफर करताना साथ असणार आहे ती तलावातल्या रंगीबेरंगी माशांची. या तलावात आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांच्या हस्ते कोळीकार्प हे रंगीत मासे सोडण्यात आले. यावेळी या बोटींची सुद्धा चाचणी घेण्यात आली. या चाचणीच्यावेळी काही मुलांनी या सफरीचा आनंद लुटला.