मंदिरांपेक्षा ज्ञानमंदिरे उभारण्याची आवश्यकता-औताडे
ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांत शिक्षणावर खर्च करण्यात बराच फरक पडत असून शहरी विद्यार्थ्यांसाठी त्यांचे पालक मोठा खर्च करत आहेत त्याचवेळी ग्रामीण भागातील पालक मात्र हरीनाम सप्ताह व मंदीर बांधण्यात व्यग्र आहे.यावेळी सत्कारमुर्ती प्रभाकर वलटे यांनी आपल्या कार्यकालातील घटनांना उजाळा दिला.कार्यक्रम प्रसंगी नाशिक जि.प.सदस्य महेंद्र काले,रमेश शिंदे,संतोष देशमुख,राजेंद्र खिलारी, छन्नुदास वैष्णव यांची भाषणे झाली.यावेळी विठ्ठल आसणे,बाबासाहेब खिलारी,शिवाजीराव लावरे,विजय शेटे,दहिगाव, लौकी, गोधेगाव येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व मुख्याध्यापक , दहिगाव बोलका शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सुरेश सोनवणे आभार विशाल काकडे यांनी आभार मानले.
