मुंबई, दि. 03, फेब्रुवारी - दिवसेंदिवस मुंबई सारख्या शहरात जमिनीचे गगनाला भिडणारे भाव, बेसुमार वाढणारी लोकसंख्या, महागाई, कंपन्यांची सक्तीची वा स्वेच्छानिवृत्ती या सार्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी आपल्या मूळगावी म्हणजेच कोकणाकडे वळू लागले आहेत. त्यांना शेती, शेतीपूरक उद्योग, त्यासाठी असणार्या शासकीय कृषी योजना यांची इत्यंभूत माहिती व्हावी या उद्देशाने कोकण विकास प्रतिष्ठानने शनिवार दि. 10 फेब्रुवारी रोजी, सायं. 6 वा, महाराष्ट्र हायस्कूल क्र.2, दत्ता राऊळ मैदानासमोर, दादर (प.) येथे ’शासकीय कृषी योजना’ या विषयावर विनामूल्य मार्गदर्शन सभा आणि 24 ते 25 फेब्रुवारी दरम्यान रोहा, लोणेरे, इंदापूर येथे एका ’शेती पूरक उद्योग’ अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौर्यात कुक्कुटपालन, मत्स्यशेती, नर्सरी इ. शेती पूरक उद्योगांना, कृषी विद्यान केंद्राला भेट व त्यांची सविस्तर माहिती अभ्यांगतांना मिळेल. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त इच्छूकांनी फायदा घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 9869016092 / 9619828669 / 9322178343 यावर संपर्क साधावा.
कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे शासकीय योजना व शेतीपूरक उद्योग अभ्यासदौरा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:59
Rating: 5