‘कमांड एण्ड कंट्रोल’ रुममुळे प्रभावी वनसंवर्धन -सुधीर मुनगंटीवार
नागपूर, दि. 03, फेब्रुवारी - संवर्धनासाठी राबविण्यात येणार्या विविध योजनांचे नियंत्रण व समन्वय ‘कमांड ण्ड कंट्रोल’ रूमच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सुलभ होणार आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर तसेच जीआयएस प्रणालीसह सुसज्ज असलेली ही देशातील पहिली ‘कमांड ण्ड कंट्रोल’ रुम असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नागपुरातील वनभवन येथे वनसंरक्षण व संवर्धनासोबतच वन्यजनावरांच्या संरक्षणासाठी तसेच नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कमांड ण्ड कंट्रोल’ रुमचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील वन विभागामध्ये पारदर्शकता व गतिमानता आणण्यासोबतच वनसंरक्षण व संवर्धन तसेच प्रभावी नियोजनासाठी एकाच ठिकाणी सर्व मा हिती उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई, हैद्राबाद, भोपाळ भारतातील आदी ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षाचा अभ्यास करुन अत्याधुनिक तंत्राचा वापर असलेली आणि व्हिडिओ वॉल तसेच जीआयएस प्रणाली असलेली सर्वोकृष्ट ‘कमांड ण्ड कंट्रोल’ तयार करण्यात आली आहे. यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या अत्याधुनिक ‘कमांड ण्ड कंट्रोल’ रुममुळे प्रशासन तसेच प्रत्यक्ष नियोजनामध्ये प्रभावी समन्वय होणार आहे.