Breaking News

ठाण्यात शनिवारी घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया उपकरणांचे प्रदर्शन

ठाणे, दि. 03, फेब्रुवारी - ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने ’’स्वच्छ सर्वेक्षण 2018’’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया उपकरणे प्रदर्शन उद्या 3 फेब्रुवारी रोजी सक ाळी 11.00 वाजता भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते शिवाजी मैदान ,तलावपाळी स्टेशन रोड ठाणे येथे संपन्न होणार आहे.


या प्रदर्शनात जवळपास 50हून अधिक स्टॉल्स सहभागी होणार आहेत. या प्रत्येक स्टॉल्समध्ये कचरा व्यवस्थापनचे तंत्रज्ञान, खतनिर्मिती, पुनर्वापर आदी गोष्टीची माहिती या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. ठाण्यात होणार्‍या या ’’घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया उपकरणे प्रदर्शनाला’’ ठाण्यातील नागरिकांनी भेट देऊन कचरा व्यवस्थापनातील नवनवीन उपकरणाची माहिती घेऊन त्या उपकरणांचा आपल्या कचरा व्यवस्थापनात वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.