Breaking News

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड

मुंबई : मालाडमध्ये हाईप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणार्‍या टोळीचे मुंबई पोलिसांनी भांडाफोड केले आहे. यावेळी पोलिसांनी दोन दलालांसह काही तरुणींना अटक केली आहे. विशेष म्हणजे पंजाबी व हिंदी अल्बममध्ये मुख्य भूमिका करणारी मॉडेलही छाप्यात आढळली आहे. अटक करण्यात आलेली टोळी फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या नावाखाली मुलींना चित्रपट आणि अल्बममध्ये काम देण्याचे कारण सांगत असे. तसेच या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून सेक्स रॅकेट चालवत होते. 


जयरुपचंद राठोर आणि आशिफ इरफान सूरज ज्वाला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबईत स्वीट चिलीज या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दरम्यान जयरुपचंद राठोर आणि आशिफ इरफान सूरज ज्वाला हे मुली सप्लायसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी 1 तरुणी आणि 2 जणांना अटक करण्यात आली. पिटा अ‍ॅक्टअंतर्गत आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना बोरिवली न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.