Breaking News

बीडमध्ये सरकारच्या तूर खरेदी आदेशाची अद्यापही अंमलबजावणी नाही


बीड : राज्यात सर्वत्र कालपासून तूर खरेदी सुरु करावी, असे आदेश शासनाने दिले असले तरीही, बीड जिल्ह्यात माजलगाव वगळता अकरा खरेदी केंद्रांत अद्यापही तूर खरेदी सुरु झालेली नाही. याकारणास्तव शेतक-यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. नाफेडने पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून दिली नसल्याने, तूर घेऊन आलेल्या शेतक-यांना निराशेने परत जावे लागले.तसेच जिल्हा मार्केटिंग कार्यालय आणि नाफेडच्या अधिका-यांनी सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत, तूर खरेदी केंद्र सुरु केले नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र तुरीचे पीक जोमात आल्याने यंदा चांगली विक्री होईल असा समज शेतकरी वर्गात होता. मात्र सरकारने अगोदरच तूर खरेदीला उशीर केला आणि आता बीड जिल्ह्यातल्या गेवराई, बीड, वडवणी, परळी, शिरूर, अंबाजोगाई, केज, पाटोदा, कडा, या ठिकाणी केंद्रच सुरु झालेली नाहीत.