Breaking News

न्यायाधीशांच्या वादावर पडणार पडदा


सर्वोच्च न्यायायलयाच्या चार न्यायाधीशांनी खटले वाटपावरून निर्माण झालेल्या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी 12 जानेवारीला नोंदवलेल्या आक्षेपांनंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या सहीने सर्वोच्च न्यायालयाच्या खटलेवाटपासंदर्भात एक अधिसूचना काढण्यात आली. या तेरा पानांच्या अ धिसूचनेनुसार यापुढे जनहित याचिकाची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा स्वतः करणार आहेत. याशिवाय खटल्याचे वाटप करण्यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार 11 न्यायाधीशांची सूचीही अधिसूचनेत जारी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतल्यामुळे खळबळ उडाली होती.