Breaking News

शिक्षणामुळे डॉ.जाकीर हुसेन उच्च पदापर्यंत पोहोचले - नईम सरदार

नगर - भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ.जाकीर हुसेन यांचे असे मत होते परमेश्वराने मानवाला बुद्धी देऊन सर्वात मोठी कृपा केली आहे. बुद्धीच्या जोरावरच मानव आज चंद्रावर पोहचला आहे. बुद्धीला जागृत करण्याचा काम शिक्षण करते. शिक्षणामुळे मानवी जीवन उत्तम घडत असते व मानवी विचार सरणी बदलत असते. शिक्षणामुळे डॉ.जाकीर हुसेन उच्च पदापर्यंत पोहोचले. तेव्हा युवकांनी जास्तीत जास्त वाचन करुन उच्च शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नईम सरदार यांनी केले.

माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.जाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर सोशल फाऊंडेशन ट्रस्ट व मखदुम सोसायटी यांच्यावतीने रामचंद्र खुंट येथे फाऊंडेशनच्या कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी नादीर खान, इंजि.इम्रान खान, जावेद खान, मुबिन शेख, नाजिम शेख, शादाब शेख, राजमोहंमद नूरी, पै.मोसिम शेख, कासमभाई केबलवाला, राजूभाई शेख, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद खान यांनी केले. प्रास्तविक आबीद खान यांनी तर आभार शादाब शेख यांनी मानले.