स्कॉलरशीपची पहिल्यांदाच ऑनलाईन सराव परीक्षा
सिंधुदुर्गनगरी, दि. 23, फेब्रुवारी - आतापर्यंत स्कॉलरशीप परीक्षा ही फक्त लेखी स्वरूपात घेतली जात होती. मात्र पहिल्यांदाच स्कॉलरशीपची सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली एम. के. सी. एल. ने जिल्ह्यात पहिल्यांदाच हे माध्यम स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थांचा आज गुरुवारी एम. के. सी. एल. च्या वतीने सत्कार करण्यात आला.
पाचवी आणि आठवी इयत्तेतल्या विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएल मार्फत पहिल्यादाच घेण्यात आलेल्या ऑनलाईन सराव परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळाला. एमकेसीएलच्या जिल्हाभरातल्या 30 केंद्रावरून 1357 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सराव परीक्षा दिली. या वर्षी पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली त्या विद्यार्थ्यांचा गुरुवारी कुडाळ येथील स्पाईस कोकण हॉटेलमध्ये एम.के.सी.एल.च्या वतीने सत्कार करण्यात आला. पाचवीमधून आचर्याच्या वेदांत गोसावी आणि कुणक वळेच्या ऋतुजा मेस्त्री यांनी 276 गुणांसह पहिला, वेदराज गवस, साई प्रभू आणि गौरेश तेली यांनी 274 गुणांसह दुसरा तर आदित्य नाईक याने 272 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. तर आठवीमधून मालवणच्या श्रावणी प्रवीण कुबल हिने 286 गुणांसह पहिला, भेडशीच्या चिन्मय दत्ताराम दळवी याने 280 गुणांसह दुसरा तर मृण्मयी विजयानंद गायकवाड हिने 278 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील या नव्या उपक्रमामुळे आत्मविश्वास वाढल्याच सांगितले. या सराव परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. इतर विद्यार्थ्यांचा सत्कार एमकेसीएलच्या केंद्रावर करण्यात येणार आहे.