वगड महाविद्यालयाने केला प्रवेशाचा व्यवस्थापकीय कोटा रद्द
सिंधुदुर्गनगरी, दि. 23, फेब्रुवारी - शिक्षण विकास मंडळ देवगड संस्थेने धाडसी निर्णय घेऊन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून देवगड महाविद्यालयीन प्रवेशासाठीचा व्यवस्थापन कोटा रद्द करून फक्त गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देणार असल्याचे संस्थेचे सभापती अॅड.अमित जामसंडेकर यानी जाहीर केले.
प्रचलीत शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र प्रत्येक संस्थेत व्यवस्थापन कोट्याच्या 15 % सिट्स राखीव असतात, ज्याची प्रवेश प्रक्रिया संस्थेच्या वतीने राबवली जाते. परंतु सदर शिक्षण वर्षापासून या 15 टक्के राखीव सिट्स रद्द करून व्यवस्थापन कोट्यातील सर्व प्रवेश सुद्धा गुणवत्तेच्या आधारावर केले जाणार असल्याचे अॅड.अमित जामसंडेकर यांनी सांगितले. संस्थेच्या नियामक समितीच्या सभेत तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
शिक्षण विकास मंडळ देवगडने गेल्या दोन वर्षांमध्ये देवगड तालुक्यातील शैक्षणिक दर्जा सुधारण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, तसेच प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि कार्यक्षम असणे आवश्यक आहे. हे संस्थेचा मुख्य धोरण असल्यामुळे महाविद्यालयातील सर्वच शाखांमधील सर्व जागा गुणवत्तेच्या आधारे भरण्याचा निर्णय घेत असल्याचे संस्था सभापतींनी सांगितले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठीचे स्वप्न उराशी बाळगून संस्थेने गेली 2 वर्षे जी वाटचाल सुरु केलेली आहे, त्या प्रयत्नांचाच हा एक भाग असल्याचे सांगतानाच प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारच्या शिफारशींचा विचार न करता अत्यंत पारदर्शक पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश प्राचार्य, उपप्राचार्य तसेच महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचार्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबतीत पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम असू नये यासाठी सदर निर्णय प्रवेश प्रक्रियेच्या तीन महिने अगोदरच घेत असल्याचे सभापतींच्या वतीने सांगण्यात आले.
आज शैक्षणिक संस्थांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याचा सामाजाचा कल वाढलेला असताना संस्था कोटा रद्द करून गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देण्याचा देवगड शिक्षण संस्थेचा हा निर्णय निश्चितपणे धाडसीच म्हणावा लागेल.