कर्जत - जामखेड मतदारसंघ ताब्यात घेऊ - पक्षनिरक्षक राजेंद्र राठोड
जामखेड येथील विश्रामगृहावर पक्षनिरक्षक राजेंद्र राठोड यांनी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकी निमित्त आयोजीत केली होती. त्यावेळी पक्षनिरक्षक राठोड बोलत होते. यावेळी दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे उपस्थित होते. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना राठोड म्हणाले की, पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. त्यादृष्टीने तयारी म्हणून गावोगाव शाखा उघडणे, पदाधिकारी नियुक्त करणे, जिंकणे हा एकच निकष समोर ठेवून पक्षकार्य करायचे आहे. इतर पक्षातील काही नेते येणार असेल तर त्यांना प्रवेश देऊ, परंतु ऐनवेळी येणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाणार नाही. कर्जत-जामखेड मतदारसंघात शिवसेनेला मानणारा वर्ग आहे. युतीमुळे भाजपकडे मतदारसंघ गेला आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी अचानक युती तुटल्याने प्रचाराला अल्पकाळ मिळाला होता. तरीही पक्षाला दुसर्या क्रमांकाचे मतदान झाले.
