Breaking News

कुळधरणला जोडणाऱ्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला वेग


कुळधरण/प्रतिनिधी/- कर्जत तालुक्यातील कुळधरणला जोडणाऱ्या रस्त्यांची डांबरीकरण कामे वेगाने सुरु आहेत. हिरडगाव फाटा-कुळधरण, राक्षसवाडी बुद्रुक-कुळधरण तसेच कर्जत- कुळधरण दरम्यान रस्त्यांचा यात समावेश आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील कुळधरण हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्याने सर्व भागातून नागरिक बाजारहाट करायला येथे येतात. रस्त्यांची कामे होत असल्याने दळणवळण करणे अधिक सोयीस्कर बनले आहे. कुळधरण- श्रीगोंदा दरम्यान रस्त्याचे दुपदरीकरण काम झाले आहे. कार्पेट टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. धालवडी- तळवडी दरम्यान एक किलोमीटरचे काम झाले आहे. राक्षसवाडीहुन कुळधरण पर्यंतचे डांबरीकरण अंतिम टप्प्यात आहे.