Breaking News

आर्थिक सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मतेकरिता सीमा सुरक्षा विभागाचे महत्त्वाचे योगदान - राज्यपाल

मुंबई,- मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून यात सीमा शुल्क विभागाचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. व्यवयास, पर्यावरण, आर्थिक सुरक्षा आणि राष्ट ्रीय एकात्मता यासाठी सीमा शुल्क विभाग कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सीमा शुक्ल विभागाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय कस्टम डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. 



राज्यपाल म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वांत वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत गणली जाते. सीमा शुल्क विभाग हा पर्यावरण, वन्यजीव तसेच वारसा रक्षणाबरोबर बनावट भारतीय चलनी नोटांना प्रतिबंध करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या विभागाचे कार्य दृकश्राव्य, चित्रपट, लघुपट आदींद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचले पहिजे.
 
कस्टम विभागाने उद्योग व व्यापार संदर्भात यापूर्वीच महत्वाची पाऊले उचलली असून आयात-निर्यातीच्या मंजुरीसाठी ‘रिस्क मॅनेजमेंट सिस्टिम’ आणि ‘पोस्ट क्लिअरन्स ऑडिट’ या इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे, असेही ते म्हणाले.राज्यपाल पुढे म्हणाले की, जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2025 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत होईल. यासाठी गुंतवणूक दारांना आकर्षित करण्यासाठी योग्य पावली उचलली जात आहे. 

परदेशी आणि थेट गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र अनुकूल राज्य आहे. याकरिता महाराष्ट्र सरकार पुढील महिन्यात ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स’ परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सीमा शुल्कसह सर्व विभागानी व्यवसाय सुलभीकरणासाठी (‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’) विशेष प्रयत्न केले पाहिजे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी सीमा शुल्क विभागच्या ’क्यूआर कोड’चे तसेच कॉफी टेबल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट क ार्य केलेल्या अधिकार्‍यांना सन्मानित करण्यात आले.