Breaking News

जामखेडमध्ये भरदिवसा गोळीबार डॉक्टर सह दोनजण जखमी



जामखेड /प्रतिनिधी :- ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जामखेडमध्ये दु. 12 वा पंचायत समिती कार्यालयासमोर भर रस्त्यावर झालेल्या गोळीबारात शहरातील डॉ. सादिक जानमोहम्मद पठाण (जामखेड) आणि कय्युम सुलेमान शेख हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगरकडे हलविण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी डॉ. सादिक पठाण यांच्या वडीलांवर पाटोदा येथे हल्ला करून जखमी केल्याने त्यांनाही नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले.
काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  डॉ.सादिक पठाण मूळ रा. नाळवंडी ता. पाटोदा जि. बीड हल्ली रा. जामखेड तसेच कय्यूम सूलेमान शेख, मोहसीन रफिक पठाण, अकील सय्यद हे चौघेजण मारूती गाडीतून (एम.एच. 23 ई 4289) नगर रोडवरील पंचायत समितीच्या कार्यालयासमोरून जात आसतांना समोरून येणार्‍या (एम एच 12 जेसी 6372) या स्कार्पिओ गाडीतून पाच सहाजण जणांनी येवून त्यांच्या दिशेने पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी डॅा. सादिक पठाण व दूसरी गोळी कय्युम सूलेमान शेख या दोघांच्याही मांडीवर गोळी लागून दोघे गंभीर जखमी झाले. या वेळी आचानक झालेल्या गोळीबारात बाजूच्या नागरिकांची पळापळ झाली, दुतर्फा वाहने थांबल्याने गर्दी झाल्याने, हल्लेखोर यामध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पगार सहकार्‍यांसह घटनास्थळी धावले. जखमी डॅा. सादिक पठाण यांना ग्रामीण रुग्णालयात तर कय्युम शेख यांना खाजगी रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने अहमदनगर रवाना केले आहे.