Breaking News

माथाडींचा लाक्षणिक संप यशस्वी

नवी मुंबई, दि. 01, फेब्रुवारी - राज्यातील 36 माथाडी मंडळांचे विलीनीकरण करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या अध्यादेशा विरोधात राज्यातील सर्व माथाडी कामगार संघटनांनी काल एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. याची दखल घेत आज कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मंत्रालयात संबंधित घटकांची बैङ्गक घेऊन हा अध्यादेश रद्द करत असल्याचे जाहीर केले, अशी माहिती माथाडी नेते तथा आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली. 


या बैठकिला विविध कामगार संघटनांचे नेते डॉ.बाबा आढाव,आमदार नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, भाई जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच कामगार सचिव राजेशकुमार,सह सचिव विधळे,कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम,सह कामगार आयुक्त (माथाडी) लाखस्वार,सहाय्यक कामगार आयुक्त विश्‍वास जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.