Breaking News

कानिफनाथ यात्रेची तयारी पूर्ण


पाथ्रडी /प्रतिनिधी /- भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे. आगामी गुरवार ,१ मार्च २०१८ पासून होळी यात्रेस प्रारंभ होत आहे. रंगपंचमी हा नाथांच्या समाधीचा मुख्य दिवस असून त्या दिवशी संपूर्ण राज्यभरातून लाखो भाविकगण दर्शनासाठी येत असतात. पुढे होळी पासून गुढी पाडव्या पर्यंत ही यात्रा १५ दिवस भरते. यावर्षी देवस्थानच्या वतीने प्रथमच तीन दिवस समाधी गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला आहे. भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.