डॉ. गोयल यांच्या निधनामुळे हानी : डॉ. विखे
लोणी : आंतराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले हृदयरोगतज्ज्ञ आणि पद्म पुरस्काराने सन्मानित, वैद्यकीय क्षेत्रामधील ज्येष्ठ व्यक्तीमत्व तसेच प्रवरा परिवारातील पितृतुल्य सदस्य असलेल्या डॉ. बी. के. गोयल यांच्या निधनामुळे प्रवरा परिवार आणि वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे प्रतिपादन प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलपती आणि प्रवरा मेडिकल ट्रष्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे यांनी केले. प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा अभिमत विद्यापिठामध्ये आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. आर. सी. जयराज, प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
