Breaking News

संगमनेरच्या विठ्ठल पानसरेंना टीडीएफची उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी

संगमनेर (प्रतिनिधी) आगामी होत असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून टीडीएफचे लोकप्रिय कार्यकर्ते विठ्ठलराव पानसरे यांनी उमेदवारी करावी अशी मागणी उत्तर महाराष्ट्रातील पाच ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून सुरु झाली आहे.


येत्या जुलै मध्ये नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे.टीडीएफच्या संघटनेचा उमेदवार आणि विजय हे सोपे सुत्र या मतदार संघात आहे.संगमनेर येथील टीडीएफचे निष्ठावान कार्यकर्ते विठ्ठलराव पानसरे यांनी उमेदवारी करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.पानसरे हे हाडाचे शिक्षक असून मागील 40 वर्षांपासून टीडीएफचे कार्यकर्ते आहे. अहमदनगर,नाशिक,धुळे,जळगांव,नंदुरबार मध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

शिक्षकांचा अनेक प्रश्‍नांवर वेळोवेळी त्यांनी शासन दरबारी संघर्ष केला आहे.शिक्षकांच्या सु:ख,दु:खात सहभाग घेतला आहे.अनेक वेळा त्यांचे नाव चर्चेत येवून ही त्यांनी टीडीएफ संघटनेचे काम प्रामाणिकपणे सांभाळले आहे.अभ्यास,दुरदृष्टी असलेल्या पानसरेंचे संघटनात्मक काम,विविध विषयांचा सखोल अभ्यास,मांडणी यामुळे शासन दरबारी त्यांचा मोठा प्रभाव आहे.

पानसरे यांना उमेदवारीसाठी अनेक ठिकाणी बोलावून आग्रह केला जात आहे.तसेच शिक्षक संघटनेच्या विविध मागासवर्गीय संघटनांचाही मोठा पाठिंबा त्यांनी व्यक्त केला आहे.पाच ही जिल्ह्यातील अनेक संघटनांचे पदाधिकारी त्यांना संगमनेरमध्ये येवून पाठिंबा व्यक्त करत आहेत.कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे उमेदवारीचे संकेत विठ्ठल पानसरे यांनी दिल्याने ते टीडीएफचे प्रमुख उमेदवार असतील अशी चर्चा सुरु झाली आहे.