Breaking News

पानोडीत शिवजयंती उत्साहात


आश्वी प्रतिनिधी ;- संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे तरुणाईच्या पुढाकारातून शिवजयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली. शिवछत्रपती व माऊली ग्रुपच्यावतीने तरुणांनी संपूर्ण गावातून भगवे झेंडे लावून भगवामय वातावरणाची निर्मिती केली. सकाळी हनुमान मंदिरासमोर ग्रामस्थांच्या उपस्थित शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिवसभर शिवरायांचे पोवाडे व शिस्तुतीने वातावरण शिवमय झाले. सायंकाळी शिवरायांच्या घोषणा व संगीतमय वातावरणातून प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद शेवाळे, तुषार पाबळ, संतोष जाधव, किरण तळेकर, मारुती पाबळ, भाऊसाहेब तळेकर, शंतनू पाबळ, संदीप सानप, राकेश तळेकर, गणेश जाधव, शिवाजी जाधव, तुषार लाडगे, पप्पू जाधव, बंडू जाधव आदींनी पुढाकार घेतला.