Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक : उमेवारांसमोर मोठा पेचप्रसंग


श्रीरामपूर / प्रतिनिधी :- राज्य निवडणूक आयोगाने जानेवारीत राज्यातील मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापन होणा-या ३१७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याबरोबरच ४ हजार १०१ गावामधील ६ हजार ८७१ रिक्त सदस्यासाठी पोटनिवडणुकीचाही कार्यक्रमही जाहीर केला. या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावायाचे आहेत. सोमवारपासून ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. परंतु या उमेदवारांसमोर मोठा पेच पुढे मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. दिवस रात्र अर्ज सादर करण्यासाठी ‘नेट कॅफे’मध्ये बसून देखील निवडणूक आयोगाचा वेब सर्व्हर स्लो असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येत नाहीत. हा पेच कसा सोडवायचा, या मानसिकतेने इच्छुकांना मात्र चांगलाच घाम फुटला आहे. या तांत्रिक अडचणीकडे वेळीच प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.