प्रवरानगर : परिक्षेत जास्त गुण मिळविण्याबरोबरच कला, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमात आघाडीवर असलेल्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मांदिरच्या विद्यार्थिनींनी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सर्वच वयोगटात ज्यास्तीत जास्त बक्षीस प्राप्त केली. मात्र या मॅरेथॉननंतर रिकामे झालेले मैदान आणि २२ हजार स्पर्धकांना ‘रिफ़्रेशमेन्ट’ च्या माध्यमातून देण्यात आलेल्या बिस्कीट आणि सुगंधी दुधाच्या पिशव्यानी व्यापून गेल्याचे लक्षात येताच या विद्यार्थिनी ‘स्वच्छतादूत’ बनल्या. या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसांचा आनंद काही वेळासाठी बाजूला ठेवत या विद्यार्थिनींनी काही एकराचा हा परिसर पूर्णपणे स्वच्छ केला.
‘प्रवरा’च्या विद्यार्थिनी ‘मॅरेथॉन’नंतर बनल्या ‘स्वच्छतादूत’
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:59
Rating: 5
Post Comment