उक्कलगांव प्रतिनिधी :- उक्कलगांव आणि गळनिंबच्या असलेले जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आलेले मोठेबाबा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यादरम्यान, येथील घराघरांत पाहुण्यांची परिसरात वर्दळ होती. यात्रेतील लोकनाटय तमाशाच्या जिवंत कलेचा अनेकांनी आनंद लुटला. या यात्रोत्सवात लहान मुलांसह महिलांसाठी विविध खेळण्या आणि सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांची रेलचेल पहायला मिळाली. उंच उंच पाळण्यांत बसण्याचा आनंद बच्चे कंपनीने चांगलाच लुटला. या यात्रेच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली.
‘मोठेबाबा’ यात्रा उत्साहात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:30
Rating: 5
Post Comment