पुणे : पुण्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी घडलेल्या हिंसाचाराचे आरोपी मिलिंद एकबोटे हे शुक्रवारी पोलिसांना शरण आले आहेत. एकबोटे स्वतःहून शिक्रापूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मिलिंद एकबोटेंने उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र, या प्रक रणातील घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांना त्यांना अटक करण्याचे आदेश कायम होते. अखेर सर्व मार्ग बंद झाल्याने 53 दिवसानंतर एकबोटे स्वत:हून पोलीस ठाण्यात शरण आले. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाने चार दिवसापूर्वी 14 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला होता. न्यायालयाने 14 मार्चपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर करताना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घ्यावे किंवा अटक करावी असे निर्देश दिले होते. मुंबई उच्च न्यायालया एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.एकबोटे यांनी दिलेल्या चिथावणीनंतर कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली, असा त्यांच्यावर आरोप आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अॅट्रॉसिटी) त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून चिथावणी देणे, दगडफेकीस प्रवृत्त करणे, लोकांना चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने एकबोटे यांनी पुणे सेशन न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र एकबोटे यांच्यावर दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले होते. अखेर 53 दिवसानंतर एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी स्वत:हूनच शरण आलेला आहे.
मिलिंद एकबोटे पोलिसांना शरण भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:39
Rating: 5