Breaking News

महागाई वाढण्याचे संकेत भांडवली बाजारात घसरण ; आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजरात घसरणीचे संकेत मिळाल्याने भांडवली बाजाराची सुरुवात देखील घसरणीने झाली होती. शुक्रवारी दिवसभरात बाजारात दबाव दिसून आला. शेवटी महागाई वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी काही प्रमाणात घसरण होत बंद झाले. दिवसातील कमजोरीदरम्यान सेन्सेक्स 33,691 आणि निफ्टी 10,340 पर्यंत घसरला होता. फेबुवारी महिन्यातील एफ ऍण्ड ओच्या समाप्तीच्या दिवशी बाजारात दबाव आला होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही विक्री दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरत बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी क मजोर झाला. बीएसईचा सेन्सेक्स 25 अंशाने घसरत 33,819 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 15 अंशाने घसरत 10,382 वर बंद झाला. बँक निफ्टी घसरत 24,995 वर बंद झाला. वाहन, एफएमसीजी, धातू, पीएसयू बँक, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभागात विक्री दिसून आली. आयटी, औषध, रियल्टी समभागात काही प्रमाणात खरेदी दिसून आली.सन फार्मा, अरबिंदो फार्मा, अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इंडियाबुल्स हाऊसिंग, इन्डसइंड बँक 3-1.75 टक्क्यांनी वधारले. बीपीसीएल, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब, पॉवरग्रिड, यूपीएल, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ऍक्सिस बँक 4.5-1.4 टक्क्यांनी घसरले.