‘भूमी अभिलेख’ची चौकशी करा अन्यथा आंदोलन
यात म्हटले आहे, की या विभागाच्या अहमदनगर येथील उपअधिक्षक सुनिता चव्हाण यांनी नोव्हेंबरमध्ये सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. या तक्रारीबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल, असे उपस्थित तक्रारदारांसह संघर्ष सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना यावेळी आश्वासन दिले होते. या अहवालावर वरिष्ठ अधिकारी लवकरच निर्णय घेऊन न्याय देतील, असेही सांगण्यात आले होते. परंतु दोन महिने होऊनही वरिष्ठांकडून अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे या विभागाचे अधिकारी पंकज फेगडे यांना संबंधित संसंस्थेच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. मागील चौकशीचा काय निर्णय झाला, असा जाब विचारण्यात आला. यावर चौकशी अधिकारी फेगडे यांनी सांगितले, की संघर्ष सामाजिक संस्थेच्या आंदोलनाची दखल वरिष्ठांनी घेतली आहे. कार्यालयप्रमुख, आवक जावक लिपिक, छाननी लिपिक, मुख्यालय सहाय्यक, परिरक्षण भूकर मापक प्रतिलिपी, न. भूमापक लिपिक आदींना उपस्थित राहण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. यामध्ये संघर्ष संस्थेचे अध्यक्ष संग्राम जोंधळेंसह संघटनेच्या सदस्यांचीही चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
