Breaking News

होळीसाठी कोकण रेल्वेच्या दोन विशेष गाड्या

रत्नागिरी, दि. 03, फेब्रुवारी - कोकणात मोठ्या प्रमाणावर साजर्‍या केल्या जाणार्‍या होळीच्या सणाच्या निमित्ताने कोकण रेल्वेने दोन विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचे ठरविले आहे.


दोन्ही गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार असून एक गाडी करमळीपर्यंत, तर दुसरी सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. तसेच दोन्ही गाड्या पहाटे एक वाजून 20 मिनिटांनीच सुटणार आहेत. करमळीपर्यंत धावणारी गाडी (क्र. 01145 / 01146) 2 मार्च ते 30 मार्च या कालावधीत दर शुक्रवारी सुटणार असून पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवी स्थानकांवर थांबत सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी करमळीला पोहोचेल. तेथून त्याच दिवशी दुपारी 2 वाजता ती परतीच्या प्रवासाला रवाना होईल. सावंतवाडीपर्यंत धावणारी गाडी (क्र. 01137 / 01138) 5 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत दर सोमवारी सुटणार आहे. ही गाडी पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानक ांवर थांबेल. परतीसाठी ही गाडी त्याचदिवशी दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी रवाना होईल.