Breaking News

‘केडीमसी’मध्ये नोकरीची संधी; 21, 22 व 23 रोजी होणार मुलाखती

ठाणे, दि. 03, फेब्रुवारी - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत ही भरती होणार असून थेट मुलाखत होणार आहे. सकाळी 9 ते 10 या वेळात अर्ज स्विकारण्यात येणार असून 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी मुलाखती होणार आहेत. अर्ज छाननी 10 ते 11 या वेळात होणार आहे. यानंतर दुपारी 12 पासून प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात होणार आहेत. 

वैद्यकीय अधिकारी 8 पदे, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - 15, स्टाफ नर्स 11, प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ रिक्त 8 पदे, औषध निर्माता एक पद तर सहाय्यक परिचारीका प्रवविका अशी एकूण 45 पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी आणि जाहिरातीसाठी ुुु.ज्ञवाल.र्सेीं.ळप या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.