कॅशिअरनेच केला 81 लाखाचा अपहार
पुणे, दि. 03, फेब्रुवारी - कॉम्प्युटरचा पासवर्ड हॅक करून आणि त्यात फेरफार करून कॅशिअरनेच तब्बल 81 लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून उघडकीस आला. मार्केटयार्ड पोलिसांनी याप्रकरणी कॅशिअरला अटक केली असून न्यायालयाने त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुल कसबे (रा.स्वामी समर्थ नगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विनोद गोयल (वय-40, रा.मार्केटयार्ड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2016 ते डिसेंबर 2017 या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे मार्केटयार्ड परिसरात दिल्ली फुड्स कार्पोरेशन नावाने भुसार किराणा मालाचे दुकान आहे. आरोपी हा त्या दुकानात बिलींग व स्टॉक चेकींगचे काम करत होता. दरम्यान हे काम करत असताना त्याने फिर्यादी यांच्या नकळत त्यांचा कॉम्प्युटरचा पासवर्ड चोरला आणि त्यात फेरफार करत 81 लाख 7 हजार 492 रुपये किमतीचा माल चोरून त्याची विक्री केली.
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादींनी कसबे याच्याकडे फसवणूक केलेल्या पैशाची मागणी केली असता त्याने फिर्यादींना विष पिवून आत्महत्या करेन आणि नावाने चिठ्ठी लिहून गुन्ह्यात अडकवेन अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.