Breaking News

श्रीगोंदा तहसीलदार यांची वाळू तस्करी विरोधात मोहीम


श्रीगोंदा/ प्रतिनिधी/- श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांच्या धडाकेबाज कारवाई मुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. तहसीलदार माळी यांनी यापूर्वीच अश्या प्रकारे कारवाई करण्याची गरज होती. श्रीगोंदा तालुका हा वाळू तस्करांचे आगार मानले जाते. याठिकाणी वाळू तस्करी करणारी मंडळी ही ना कोणाचा धाक ? ना कोणाची भीती? या अविर्भावात वागत आहे. तस्करांनी घोड भीमा नदी पात्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्यन्तरी तहसीलदार वंदना खरमाळे यांनी तालुक्यातील तहसीलदारांच्या मुसक्या आवळ्या होत्या. पण त्यांच्यानंतर महेंद्र माळी यांनी पदभार घेतल्यानंतर तालुक्यात वाळू तस्करांनी हैदोस सुरु केला होता. स्वतः तहसीलदार माळी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाळू तस्करीत सहभाग असल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर तहसीलदार माळी यांनी आक्रमक भूमिका घेत, तालुक्यातील वाळू तस्करीवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. तालुक्यातील घोड भीमा नदी पात्रात कारवाई करून सुमारे १ कोटी रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला आहे. पण तहसीलदार माळी यांनी यापूर्वीच अश्या प्रकारे ठोस भूमिका घेण्याची गरज होती अशी चर्चा तालुक्यात होत आहे