Breaking News

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो: ऐड. सुमती घाडगे पाटील .


नेवासा/ता. प्रतिनिधी/- शाळेचे वार्षिक स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो असे वक्तव्य ऐड. सुमती घाडगे पाटील यांनी केले.त्या कार्यक्रमाच्या पृमुख पाहुन्या म्हणून बोलत होत्या.आपल्या भाषणात पुढे त्या म्हणाल्या की , त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासठी धडपडत असते. या संकुलाचे विद्यार्थी देश पातळी पर्यंत जाऊन स्वताच्या आई-वडिलासह शाळेचे नाव पोहचवले आहे. आमच्या त्रिमूर्ती संकुलाचे पहिले रोपटे तेलकुडगावच्या शाळेपासून सुरु झाले. तेलकुडगावच्या मातीने आजपर्यंत नामवंत गुणवंत तसेच राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी घडवले आहेत.या गावातील विद्यार्थ्यांसाठीची साहेबराव घाडगे पाटील यांची तळमळ आहे. माझ्या मातीतील विद्यार्थी आई-वडील व शाळेचे नाव मोठे करील या साठी हे संकुल चालू केले असून या संकुलात दोन हजार विद्यार्थी व पाचशे मुला-मुलींचे वसतिगृहतुन विद्यार्थी शिक्षण घेण्याची सोय केली आहे.