योग्य नेतृत्व असेल तर संस्था प्रगती करते -- आशुतोष काळे
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक सुनील शांताराम पाठक यांचा सेवानिवृत्ती सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या स्थानीक स्कूल कमिटीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी पाटील आगवन हे होते . याप्रसंगी डॉ.सुनील देसाई , कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक संजय आगवन, रयत लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन मुकुंद अागवन , उपसरपंच रवींद्र आगवन , नवनाथ पाटील अागवन, सांडूभाई पठाण बी. बी. सांगळे, नाथा पाटील आगवन, देवीदास भिंगारे, संतोष भिंगारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
