नेवासा ता. प्रतिनिधी ;- तालुक्यातील सोनई येथील, मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित यश अकॅडमी शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य उमाकांत तिवारी आणि प्रमुख पाहुणे पालक प्रतिनिधी बाबासाहेब गडाख उपस्थित होते. शिवबा व जिजाऊंच्या वेशभूषेत अनेक विद्यार्थी उपस्थित होते. प्रांगणात लेझीम पथकाच्या गजरात घोड्यावर बसवून छोट्या शिवरायांची व मावळ्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिवरायांची महती सांगणार्या गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.