अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करणा-या अल्पवयीन मुलीविरुद्ध गुन्हा दाखल
कोल्हापूर, दि. 24, फेब्रुवारी - अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करणा-या अल्पवयीन मुलीविरुद्ध तब्बल 20 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ही निलंबित पोलीस उपअधीक्षक मधुकर शिंदे यांची मुलगी आहे. पीडित मुलाला घरकामासाठी ठेवुन त्याच्यावर लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र कु टुंबातील अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
निलंबित पोलीस उपअधीक्षक मधुकर शिंदे हे सध्या ताराबाई पार्क येथे वास्तव्यास असुन त्यांनी अल्पवयीन मुलाला घरकामासाठी ठेवले होते. शिंदे यांच्या मुलीने पीडित मुलास जिन्यावरून ढकलून दिले. मारहाण करून हात आणि पायावर चटके दिले. त्याच्या गुप्तांगावरही चटके दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. ही तक्रार बाल कल्याण संकु लातील अधिकारी अश्विनी अरुण गुजर यांनी तक्रार दाखल केली. चाईल्ड लाईनच्या समुपदेशकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या घरातून पीडित मुलाची सुटका केली. यानंतर त्याला बाल कल्याण संकुलात दाखल केले आहे.
