Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार


जामखेड ता. प्रतिनिधी ;- लग्नाचे आमिष दाखवून धर्मशाळेतील एका मुलीवर बीड जिल्ह्य़ातील परसराम डोंगरे याने अत्याचार केला. या प्रकरणी सदर मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित मुलगी ही पुणे जिल्ह्य़ातील आळंदी येथे एका धर्मशाळेत भजन कीर्तनाचा कार्यक्रम करत असते. पिडित मुलगी (मुळ. रा.पेठ पांगरा. ता.आष्टी. जि. बीड.) येथील आहे. जून २०१७ साली आषाढीवारीमध्ये आरोपी पखवाज वादक परसराम डोंगरे {रा. आंधळेवाडी ता. आष्टी} याच्या सोबत या मुलीची ओळख झाली होती. त्यानंतर {दि. १४} रोजी आरोपी परसराम डोंगरे याने पिडीत मुलीस भजनाचा कार्यक्रम आहे, असे सांगून जामखेड येथे बोलवून घेतले. त्यादिवशी दिवसभर सौताडा येथे देवदर्शन करुन आल्यावर पोखरी येथील भजन रद्द झाले आहे, असे सांगत जामखेड येथील बसस्थानकासमोरील जय तुळजाभवानी भवानी लॉजवर मुलीस घेऊन गेला. मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे, असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पिडीत मुलगी आरोपीस वारंवार लग्न कधी करणार, असे विचारत होती. मात्र आरोपी हा लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून आरोपी परसराम डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत जामखेड चे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे हे करत आहेत.