Breaking News

पारायण सोहळ्याने मनुष्याच्या जीवनाला दिशा : ह. भ. प. डोईफोडे


जीवनाचा पाया उत्तम संस्कारवरच अवलंबून असतो. ज्ञानेश्वर पारायण व गजानन कथेमुळे माणसाची अंतःकरणाची शुद्धी होते. भरकटलेल्या जीवनाला एक दिशा मिळते, असे प्रतिपादन गजानन संगीत कथेचे प्रवक्ते ह,भ,प,शंकर महाराज डोईफोडे यांनी केले.
गणेशवाडीत आयोजित केलेल्या महाशिवरात्रीनिमित्त सुरु असलेल्या पारायण व गजानन कथा सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी गजानन महाराज यांचे प्रगट विषय, देविदास बुवा, बक्कटला, दामोदर यांना झालेले दर्शन, जानकीराम सोनार यांना आलेला अनुभव आदी कथा सांगितल्या. 

याप्रसंगी ह. भ. प. सारंग बुवा थोरात, दत्तात्रय अंभोरे, श्याम बरवेकर आदींसह धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोहळा यशस्वीतेसाठी गणेश लोहकरे, आसाराम आव्हाड, अरूण गडाख, नवनाथ बेल्हेकर, मधुकर दरंदले, मुरली होन, शिवाजी दरंदले, नरवडे महाराज, निवृत्ती महाराज लांडे, व रेवणनाथ लोहकरे आदींनी पुढाकार घेतला.