Breaking News

श्रीरामपूर येथून तरुण बेपत्ता


शिर्डी/प्रतिनिधी :- शहरातील इंदिरा नगर या भागात राहणारा जिल्हा सहकारी बँकेचा कर्मचारी वीरेश रमेश भाकरे {वय- ३२} कामावर जातो, असे सांगून दि. २८ डिसेंबर २०१७ पासून बेपत्ता आहे.यासंदर्भात या तरुणाची आई विजया रमेश भाकरे हिने श्रीरामपूर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मिसिंगचा गुन्हा दाखल केला. जवळपास ५० दिवस उलटल्यानंतरही या तरुणाचा शोध न लागल्याने हे कुटुंबीय चिंताग्रस्त आहे. या तरुणाबद्दल माहिती मिळाल्यास श्रीरामपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस नाईक बडे यांनी केले आहे.