Breaking News

बिबट्याने घेतला भर दुपारी नरडीचा घोट

मनमाड/ प्रतिनिधी। 24 : शहरापासून जवळ असलेल्या वागदर्डी परिसरात एका व्यक्तीचा वन्यप्राण्यांच्या हल्लात मृत्यू झाल्याने मनमाडसह परिसरातील नागरिकांना मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे हा हल्ला बिबटया चा असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली असली तरी भर दुपारी नरडीचा घोट घेणारा प्राणी कोणता याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.