Breaking News

युवकांनी स्वतःला सिद्ध करण्याची वेळ - डॉ. क्षितीज घुले


आजच्या काळात पारंपारीक वारसा आपणास सिद्ध करू शकत नाही, तर आपल्या कार्यकर्तृत्वाने विद्यार्थी जीवनातील युवकांनी स्वतःला सिद्ध केल्याशिवाय न्याय हक्क ते मिळवू शकत नाही. तसेच विद्यार्थ्यांरोबर विविध क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना स्वतःला सिद्ध करून दाखविण्याची वेळ आजच्या घडीला आली असल्याचे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी केले. शेवगाव तालुक्यातील दहीफळ-जुने येथील घुले पाटील शिक्षण संस्थेच्या दहेश्‍वर माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्‍वर कारखान्याचे संचालक पंडित भोसले होते. कार्यक्रमास पं. स. सदस्य मंगेश थोरात, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, सरपंच पांडुरंग हाके, सेवा सोसायटी अध्यक्ष संजय शिंदे, उपसरपंच कलींदर शेख, राष्ट्रवादी युवा कार्यकर्ते अजिंक्य लांडे, अजय नजन, से.सो.चे माजी अध्यक्ष सुधाकर भोसले, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण भारस्कर, अंकुश शिंदे, बाजीराव मगर, इब्राहिम शेख, जावेद शेख, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.