Breaking News

मंदीर परिसरात वाहतुकीची कोंडी


लाखो रुपयांचा निधी वापरुन मंदीराच्या पश्‍चिमेला वाहनतळ बांधण्यात आलेले आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे या वाहनतळाचा वापर सहसा होत नाही. मंदीराच्या समोर वाहने लावली जात असल्याने वापरासाठी रस्ता अपुरा राहतो. राज्यभरातून येणार्‍या भाविकांची वाहने मंदीराच्या दिशेने येऊन ती मंदिराच्या समोरच्या बाजूस रस्त्यावरच लावली जातात, त्यामुळेच वाहतुकीची कोंडी होते. वाहतुक कोंडी नियंत्रणासाठी पोलिसांची कोणतीच यंत्रणा कार्यरत नसल्याने, तासन्तास भाविकांना कोंडीत अडकून पडावे लागते. मंदीर व्यवस्थापन व प्रशासकीय यंत्रणेच्या गलथान कारभाराचा त्रास भाविकांना सहन करावा लागत आहे.