Breaking News

वंजारी सेवा संघाच्या प्रदेश प्रवक्ते पदी प्रा. दादासाहेब खेडकर


वंजारी सेवा संघ या सामाजिक संघटनेच्या प्रदेश प्रवक्ते पदी प्राचार्य दादासाहेब खेडकर यांची फेरनिवड करण्यात आली. वंजारी सेवा संघाची प्रदेश कार्यकरणीची बैठक बार्शी येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर व प्रदेशाध्यक्ष विठ्ठल गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रा. दादासाहेब खेडकर, भगवानगड यांना प्रदेश प्रवक्ते पदाचे नियुक्तीपञ देण्यात आले. निवडीस उत्तर देताना, संत भगवान बाबा, लोकनेते गोपिनाथ मुंडे यांना अपेक्षित असलेला समाज घडवण्याचे संघाच्या माध्यमातून संघटीत करण्याचे अहोरात्र प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले. तसेच शिवशाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारसरणीचे अवलोकन करुन अखंड एकता अबाधित राहावी यासाठी जिवन खुर्च करू व सर्व समाजघटकांबरोबर गुण्यागोविंदाने राहता यावे यासाठी समाजकार्यात नेहमी सहभाग होऊ असे मनोगत व्यक्त केले. प्राचार्य दादासाहेब खेडकर यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यावेळी ग्रामविकास मंञी ना. पंकजा मुंडे, विरोधीपक्ष नेते ना. धनंजय मुंडे, मा. मंञी एकनाथ खडसे, नाशिक जिल्हा. मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक किशोर दराडे, राष्टवादीचे प्रताप ढाकणे यांनी दूरध्वनीद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या.