Breaking News

बसस्थानकात ‘मराठी वाचन सप्ताह’


धुळे : मराठी भाषा दिनानिमित्त एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व बस्थानकांवर 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत ‘मराठी वाचन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. प रिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात मुंबईत केली. या सप्ताहादरम्यान प्रत्येक बस्थानकावर मराठी भाषेतील पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने यांच्या विक्रीची दालने उभारली जाणार आहेत. यासाठी एसटी महामंडळातर्फे ही दालनं उभी करण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सां गितलं. विविध प्रकाशन संस्था पुस्तकं विक्री केंद यांच्या द्वारे प्रवासी तसेच एसटी कर्मचार्‍यांना सवलतीच्या दरात या कालावधीत पुस्तकं खरेदी करता येतील.