Breaking News

अग्रलेख - ‘स्वाभिमानी’ तडाखा


स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दोन शिलेदार अर्थातच राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत. दोन्ही शिलेदारांनी भाजपसोबत जात सत्तेचा मार्ग जवळ केला. मात्र सत्ताकाळाच्या दोन वर्षात सदाभाऊ सत्ताधार्‍यांच्या जवळ गेले, तर राजू शेट्टी दूर जात गेले, यामुळे दोघांमधील सुसंवाद न राहता, दोघामध्ये वाद-विवाद होऊ, लागले त्याचे पर्यावसन राजू शेट्टी यांनी भाजपापासून फासरकत घेतली, तर राजू शेट्टी यांनी सत्तेत राहणे पसंद केले. वास्तविक सदाभाऊ आज सत्तेत असले, तरी त्यांना नेहमीच राजकीय ताकद मिळेल असे चित्र नाही. त्याचाच रोष काल बघायला मिळाला. सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर गाजरे फेकत, तर काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आला. त्यामुळे एव्हाना सदाभाऊ खोत यांना आपली पुढील वाट बिकट असल्याचे दिसून आले असेल. सरकारविरोधात सर्वसामान्यांनी नाराजी वाढत असतांना, शेतकर्‍यांविषयी तुमचा कळवळा हा दुटप्पीचा दिसून येतो, अशी शेतकर्‍यांची भावना आहे. त्यामुळे सदाभाऊ येणार्‍या काळात पुन्हा स्वाभिमानीची वाट धरणे पसंद करतात, की पुन्हा भाजपाची वाट धरतात, हा येणारा काळच ठरवेल, मात्र सदाभाऊ विषयींचा रोष वाढत चालला आहे, त्यामुळे सदाभाऊ स्वाभिमानी ला काय उत्तर देतात, कसा सामना करतात, हे येणार्‍या काळात दिसून येईलच. सदाभाऊ यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर खोत यांच्या जीवनशैलीत आमुलाग्र बदल झाला. शेतकर्‍यांच्या प्रत्येक प्रश्‍नांत आघाडीवर असणारे, उत्तम संघटन कौशल्य असणारे, सदाभाऊ यांचा सत्ता सुंदरीचा मोह नडला. सदाभाऊ सत्तेत असल्यामुळे सदाभाऊंना अनेक मुंगळे चिकटले, तसेच सत्तेत रमाणारे कार्यकर्ते सदाभाऊभोवती जमा झाले. आणि त्यांची शेतकर्‍यांच्या प्रती असलेली बांधीलकी, तुटत चालल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळेच त्यांची गच्छंती झाली. आणि त्यांच्यावर आरोपांचा ससेमिरा सुरू झाला. सदाभाऊ यांच्यावर एक ा महिलेने केलेले आरोप अत्यंत, खालच्या थरांचे होते, त्यामुळे सदाभाऊ यांच्या नैतिकेतवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असतांना शेतकर्‍यांच्या संप फोडण्याचे पातक देखील सदाभाऊंच्या माथी जमा झाल्यामुळे, त्यांची पुढील राजकीय वाटचाल खडतर असणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. सदाभाऊ काही मंत्रिपदांचा राजीनामा देणार नाही, कारण पुढील पंचवार्षिक निवडणूकांनंतर देखील आपण कॅबिनेट मंत्री असून, अशी स्वप्ने सदाभाऊंना पडू लागली आहे. त्यामुळे सत्तेच्या या सारीपाटात सदाभाऊंचा राजकीय वापर होणार की त्यांचे पुनर्वसन होणार, हे येणार्‍या काळात स्पष्ट होईलच. शेतकर्‍यांचा सरकारविषयी असलेला तीव्र रोष लक्षात घेऊन राजू शेट्टी सरकारबाहेर पडले, आणि धकाँगे्रसशी सलगी साधत, विराधकांच्या गटात सहभागी झाले. मात्र तसे सदाभाऊ शेतकर्‍यांचा रोष अद्यापही समजू शकले नाही. आज शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांनी बिकट स्वरूप धारण केले आहे. अशावेळेस शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांप्रती राष्ट्रीय स्तरावर मोट बांधण्याचे काम राजू शेट्टी यांच्या शिरावर आहे. त्यांना जर सदाभाऊंनी सोबत करत, या बिकट वाटेत साथ दिली असती, तर कदाचित आज वेगळे चित्र असते. मात्र सत्तासुंदरीचा मोह सदाभाऊ यांना नडला, आणि स्वाभिमानीचा तडाखा बसला असेच म्हणावे लागेल. तर दुसरीकडे राजु शेट्टी यांना शेतक र्‍यांच्या हितासाठी व्यापक स्तरावरी लढा व्यापक करावा लागणार आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा जो बागुलबूवा सुरू आहे, त्यातील फोलपणा लक्षात आणून देण्यासाठी आपल्या आंदोलनाची धार व्यापक करावी लागणार आहे.