Breaking News

कुंटणखान्यावर छापा, दोन महिलांसह पाच जण ताब्यात


सोलापूर - जुळे सोलापुरातील साईनगर प्लॉट नंबर 96-3 पी- 14 (रेणुकानगरी रोड) या घरात वेश्याव्यवसाय सुरू असताना गुन्हे शाखेच्या विशेष पथक ाने छापा मारला. शिवानंद रामेश्‍वर येरटे (वय 42, प्लॉट नंबर 20, रा. देशमुख गल्ली, अक्कलकोट), रशीदा समदअली लष्कर ऊर्फ अंजली शिवानंद येरटे (वय 30), सादिक समदअली लष्कर (वय 20, रा. दोघे साईनगर, जुळे सोलापूर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. रशीदा व सादिक या दोघांना अटक करून न्यायाधीश माहेश्‍वरी पटवारी यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पीडित महिलांना ताब्यात घेऊन महिला सुधारगृहात ठेवले आहे.शिवानंद येरटे त्याच्या वाहनांतून महिलांची ने- आण करीत होता. त्याला आज रात्री अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पी. पी. मासाळ यांनी दिली. त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. पीडित दोन महिलांकडे आलेल्या ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर निम्मे पैसे रशीदा व निम्मे पैसे पीडित महिला घेत होत्या. विजापूर नाका पोलिसात या गुन्ह्याची नोंद झाली. अनेक दिवसांपासून या घरात हा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सादिक हा कोलकाता येथून महिलांना पैशाचे आमिष दाखवून सोलापुरात हा व्यवसाय करण्यासाठी आणतो. रशीदा या मागील पाच- सहा महिन्यांपासून जागेत राहत आहे. घराचा मूळ मालक कोण आहे याचा शोध घेत असल्याची माहिती एपीआय मासाळ यांनी दिली.