Breaking News

आश्वी येथे आढळचे बिबट्याची बछडे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण


आश्वी : प्रतिनिधी :- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील सतिष ज-हाड यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोड सुरु असताना बिबट्याची दोन बछडे सापडली आहे. येथे बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आश्वी बुद्रुक - मांची रस्त्यालगत असलेले मांचीहिल शैक्षणिक सकुंलाशेजारी ज-हाड यांची शेती आहे. येथे ऊस तोड सुरु असताना ऊस तोड मजुंराना ओरड्याचा आवाज ऐकू आला. या मजुरांनी पुढे जाऊन पाहिले असता आंब्याच्या झाडाखाली दोन बिबट्याची पिल्ले दिसली. त्यामुळे काही काळ ऊसाची तोड बंद करण्यात आली. या पिल्लांनी सुरुवात केल्याने बिबट्याची मादी तेथे आली. तिने जवळच उभ्या असलेल्या ऊस तोड मजुंरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऊस तोड मजूर तात्काळ बाजूला पळाल्याने या हल्यातून वाचले. 

हा प्रकार समजताच ज-हाड यांनी शेतीकडे धाव घेतली. याविषयी वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, बछड्याच्या विरहाने दबा धरुन बसलेल्या बिबट्याच्या मादीने मोठ्याने ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे ऊस तोड मजूर व शेतक-याची चागलीच धावपळ उडाली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत या बछड्यांना सुरक्षितस्थळी सोडले.