महिलांची छेड काढणाऱ्या इसमास अटक
दरम्यान, या प्रकरणी सदर इसमास जाब विचारण्याचा काही महिलांनी यापूर्वी प्रयत्न केला. मात्र अश्लिल शिवीगाळ करत तो पळून जायचा. त्यामुळे या महिलांची मोठी कुचंबणा होत होती. महिला बंधाऱ्यावर जाऊन कपडे धूत असतानाच ती अज्ञात व्यक्ती तेथे येऊन नेहमीचाच अश्लिल शिवीगाळ करण्याचा प्रकार करायची. या प्रकाराला कंटाळून एका महिलेने मोठ्याने ओरडून घरातील व्यक्तीस फोन करून बोलावून घेतले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. २५ ते तीस ३० ग्रामस्थांनी घटनास्थळी येताच हा इसम दुचाकीवरून पळून जायचा. मात्र एकदाचे त्याला पकडण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आणि त्या इसमाची रवानगी पोलीस कोठडीत करीत आली. यावेळी महिला सरपंचपती बाळासाहेब थोरात, विलास डांगे, रविंद्र कुर्हाडे, सिताराम कुर्हाडे, अजय गोधडे, विजय दरंदले, मछिंद्र गोधडे, सचिन आरने, संजय मुर्तडक आदींसह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Comment